मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांच्या दिवसभरातील विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या माहितीनुसार उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, यानंतर संध्याकाळी 5.00 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन दि.३१ मार्च २०२१ रोजी सायं. ५.३० वाजता महापौर निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई येथे मुख्यमंत्री श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. pic.twitter.com/HvxHGdpKZZ
— Subhash Desai (@Subhash_Desai) March 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पैसे थेट खात्यात जमा करा मगच लाॅकडाऊनचं बघा- पृथ्वीराज चव्हाण
गिरीश महाजन यांनी केलेल्या टिकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
मोठी बातमी! वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात एम एस रेड्डी निलंबित
भाजप – राष्ट्रवादीचं सोडा; पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आता अभिजित बिचुकलेंची एन्ट्री