मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं, असं म्हणत खासदार संभाजीराजे यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे. यासंदर्भात संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
दुसऱ्याने पाठवलेला अर्धवट मॅसेज वाचून छगन भुजबळ यांनी बीबीसी च्या मुलाखतीत माझ्या संसदेतील भाषणावर भाष्य केलं. ज्यात मी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग बिलावर माझी भूमिका मांडली होती. त्यांनी माझे ते भाषण त्यांच्या सर्व नेत्यांसोबत बसून ऐकावं, असं संभाजीराजेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या घटना दुरुस्ती बिलावर मी ते भाषण केलं होतं. ज्यामध्ये मराठा समाजावर कश्याप्रकारे अन्याय झाला? हे मी सिद्ध केलं होतं, असं संभाजीराजे म्हणाले. कोणीतरी दुसऱ्याने पाठवलेला अर्धवट मॅसेज वाचून छगन भुजबळांनी मी संसदेत केलेल्या भाषणावर भाष्य केलं. बी. बी. सी.मराठी वरती त्यांची मुलाखत होती, त्यात त्यांनी माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढल्याचे दिसून येते., असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्याने पाठवलेला अर्धवट मॅसेज वाचून छगन भुजबळ यांनी बीबीसी च्या मुलाखतीत माझ्या संसदेतील भाषणावर भाष्य केलं. ज्यात मी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग बिलावर माझी भूमिका मांडली होती. त्यांनी माझे ते भाषण त्यांच्या सर्व नेत्यांसोबत बसून ऐकावंhttps://t.co/2IMSYFpUrc
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 13, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का?; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल
चेन्नई सुपर किंग्सचे सनराईझर्स हैदराबादसमोर 168 धावांचे लक्ष्य
सोनिया सेना बाबर सेनेपेक्षा वाईट वागणूक देत आहे- कंगणा रणाैत