Home देश “शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण”

“शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण”

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांची आज भेट होणार आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

भेटीगाठी व्हायला पाहिजे. त्यातून संवाद होतो चर्चा होते. एक समर्थ विरोधी पर्याय निर्माण होऊ शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं. शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह आहेत. तर ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, ममता बॅनर्जींकडे देशातील विरोधी पक्ष आशेनं पाहतोय. समर्थ पर्याय उभा राहू शकतो. ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी भाजपने सत्ता संपत्ती तपास यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. याचं कौतुक पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनाही असेल. ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण ठरल्या आहेत, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘ए तु थांब रे…मध्ये बोलू नको, नारायण राणेंनी फडणवीसांसमोरच दरेकरांना झापलं; पहा व्हिडिओ

पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त- गोपीचंद पडळकर

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार”

“परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन”