मुंबई : भीमा कोरेगावची दंगल सुनियोदित होती, अशी पहिल्या दिवसापासूनची राष्ट्रवादीची भूमिका आहे. शरद पवार यांनी लेखी प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे म्हणणं मांडलं आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
चौकशी आयोगाने शरद पवार यांच्याकडे वेळ मागितली होती त्यानुसार येत्या 4 एप्रिल रोजी शरद पवार आयोगाकडे साक्ष देणार आहेत, असंही मलिक म्हणाले. या संदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आलं आहे. कोरेगाव भीमा आयोगाकडून हे समन्स बजावण्यात आलं असून 04 एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कोरेगाव-भीमा इथली दंगल सुनियोजित होती ही @NCPspeaks ची आधीपासून भूमिका आहे, आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी लेखी प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे म्हणणे मांडलेय. चौकशी आयोगाने पवार साहेबांकडे वेळ मागितली होती, त्यानुसार ४ एप्रिलला पवार साहेब आयोगासमोर साक्ष देतील- मा. @nawabmalikncp pic.twitter.com/VNEZj7twPJ
— NCP (@NCPspeaks) March 18, 2020
महत्वाच्या घडामोडी-
‘ओम भट स्वाहा’ करूयात या करोना व्हायरसचा; महेश कोठारेंनी केला तात्याविंचूचा व्हिडीओ शेअर
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स; 4 एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश
…तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा
करोनाची लागण झालेले रुग्ण आरोपी नाहीत, त्यांची नावं जाहीर करा; मनसेची मागणी