“भास्कर जाधव सोंगाड्या; काल राष्ट्रवादीचा होता, आज शिवसेनेचा आहे, उद्या भाजपचाही होईल”

0
355

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी काल सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होऊन हे प्रकरण लावून धरल्याने भास्कर जाधवांंना माफी मागावी लागली. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “नगरपंचायत, महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडीने मारली बाजी; भाजपला पराभवाचा धक्का”

भास्कर जाधव याची कोकणामध्ये लायकी उरलेली नाही. ज्या पंतप्रधानांचे जगामध्ये नाव आहे, जगात ज्यांची ओळख आहे, या सोंगाड्याला त्यांची काय किंमत कळणार? अशा सोंगाड्यांना किती महत्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे, असा घणाघात नितेश राणेंनी यावेळी केला. ते टीव्ही.9 मराठीशी बोलत होते.

दरम्यान, नाटकामध्ये जसा नरकासूर वेगवेगळे सोंग बदलत असतो. तशी भास्कर जाधवांची अवस्था आहे. काल तो राष्ट्रवादीचा सोंगाड्या होता, आज शिवसेनेचा सोंगाड्या आहे. उद्या भाजपचा पण सोंगाड्या होईल. अशा सोंगाड्या लोकांना समाजात काय किंमत आहे हे चिपळूणच्या आणि कोकणातल्या लोकांना विचारा, असा टोला नितेश राणेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“पडळकरांनी अजित दादांवर केेलेले आरोप म्हणजे, स्वत:ची किंमत वाढवण्यासाठी केलेला भाबडा प्रयत्न”

“पडळकरांनी अजित दादांवर केेलेले आरोप म्हणजे, स्वत:ची किंमत वाढवण्यासाठी केलेला भाबडा प्रयत्न”

भाजपला लाज वाटली पाहिजे, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here