आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रत्नागिरी : शरद पवार यांनी अपेक्षेपेक्षा सर्व काही दिले तरीही भास्कर जाधव का बाहेर पडले. हा प्रश्न आजही आमच्यासमोर आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. रत्नागिरीत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी दाभोळ येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून प्रतिक्रिया विचारली त्यावेळी ते बोलत होते.
एकेकाळी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत होती. खेड, गुहागर, रत्नागिरीत राष्ट्रवादीचे आमदार होते. सामंत सात वर्षांपूर्वी बाहेर पडले होते. त्यांच्याविषयी आता बोलणे योग्य नाही. त्यानंतर आमदार भास्कर जाधव बाहेर पडले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अपेक्षेपेक्षा सर्व काही दिले तरीही ते का बाहेर पडले, हा प्रश्न आजही आमच्यासमोर आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
हे ही वाचा : ”तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय”; नारायण राणेंची टीका
भविष्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले पाहिजे, यासाठी रत्नागिरीत झालेल्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी शहराच्या अध्यक्षपदी नीलेश भोसले असून त्यांनी शहरातील पक्षीय स्थितीचा आढावा घेतला होता. प्रत्येक कार्यकर्त्यांची मते आम्ही जाणून घेतली आहेत. त्यानुसार कडक कार्यवाही होईल. मागील दौऱ्यावेळीही तालुकाध्यक्षपदाचा विषय होता, तो मार्गी लागला आहे. या वेळी घेतलेल्या आढाव्यातील प्रश्नही सुटलेले दिसतील, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.
दरम्यान, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु एकमेकांचे कार्यकर्ते प्रवेश करून घ्यायचे नाहीत, असे आघाडी करताना ठरवण्यात आले होते. दापोलीतील कार्यक्रमावेळी गुरुवारी प्रवेशासाठी आलेल्यांची ओळख करून देण्यात आली. ते पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन बाहेर पडलेले होते. यावरून महाविकास आघाडीमध्ये कोणतीही कुरबूर होणार नाही, तो कालचा प्रवेश होता. आज पुन्हा प्रवेश करून घेतलेले नाहीत. तीनही पक्षांत समन्वय असून मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
जळगावमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; भाजपचा ‘हा’ मोठा नेता असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत
मनसे प्रमुख राज ठाकरेंची कोरोनावर मात