Home महाराष्ट्र “सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिलं पाहिजे”

“सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिलं पाहिजे”

मुंबई : राज्यात नाणार आणि जैतापूर प्रकल्पावरुन पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगलेली पहायला मिळाली. शिवसेनेचे लांजा-राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी एबीपी माझाशी बोलताना, सध्या कोकणात उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असं विधान केलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकल्पाला अगोदर विरोध करायचा आणि सेटलमेंट झाल्यानंतर स्थानिकांचा विरोध मावळला सांगून प्रकल्पाचे समर्थन करायचं. येच धंदे करत करत इथ पर्यंत आले. प्रकल्पाला विरोध करून सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे., असं ट्विट करत निलेश राणेंनी राजन साळवी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.


महत्वाच्या घडामोडी-

“पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही?”

“आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचं आहे”

उद्धव ठाकरे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही- निलेश राणे

…अन्यथा तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही; रोहित पवारांचा केंद्र सरकारला इशारा