दुबई : आजच्या आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान राॅयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा 7 विकेट्सनी पराभव केला.
राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 विकेट गमावत 185 धावा केल्या. पंजाबकडून युनिव्हर्सल बाॅस ख्रिस गेलने 63 चेंडूत 99 धावांची खेळी केली. मात्र गेलचे शतक केवळ एका धावेने हुकले. तर कर्णधार के.एल.राहुलने 41 चेंडूत 46 धावा, निकोलस पूरनने 10 चेंडूत 22 धावांची वेगवान खेळी केली.
धावांचा पाठलाग करताना राजस्थानने हे लक्ष्य 17.3 षटकात केवळ 3 विकेट गमावत पूर्ण केले. राजस्थानकडून बेन स्टोक्सने 26 चेंडूत 50 धावांची वादळी खेळी केली. तर संजू सॅमसनने 25 चेंडूत 48 धावांची वेगवान खेळी केली. कर्णधार स्टिव्ह स्मिथने 20 चेंडूत नाबाद 31 धावा, जाॅस बटलरने 12 चेंडूत 11 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. तर पंजाबकडून मुरूगन अश्विन व ख्रिस जाॅर्डनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
“उर्मिला मातोंडकरांनी स्वीकारली शिवसेनेची ऑफर”
राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
“भाजपचे नेते पाठीमागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात”