सातारा : राज्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी याला विरोधही होताना दिसत आहेत. साताऱ्यात स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन केलं आहे.
साताऱ्याच्या पोवईनाका येथे हे आंदोलन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून उदयनराजेंनी चक्क भीक मागो आंदोलन केलं.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला सातारा जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसूम होतं. मात्र, या लॉकडाउनला उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“…म्हणून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा”
राज्यात 28 दिवसांचा लाॅकडाऊन करा; माजी खासदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण”