“आधी पुणे शहराध्यक्षपदावरून आणि आता…; मनसेचा वसंत मोरेंना पुन्हा एक धक्का”

0
3337

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निर्णयानंतर वसंत मोरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना पुणे मनसे शहाराध्यक्ष पदावरून तडकाफडकी हटविण्यात आलं. त्यानंतर आता वसंत मोरेंनी पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

मला डावलण्याचा, बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय. काही जणांना मी पक्षात नकोय. असंही मोरे म्हणाले. तसेच मनसेच्या मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत देखील माझ नाव नाही, असंही मोरेंनी यावेळी सांगितलं.

हे ही वाचा : “शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली; अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी”

मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा मेळावा आणि नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमात मोरेंची अनुपस्थिती दिसून आली. मात्र अखेर मेळावा सूरू झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर मोरे कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

दरम्यान, वसंत मोरे यांना ही बाब खटकली असून ते म्हणाले, रात्री उशीरा व्हॉट्स अॅपवरून मला कार्यक्रम पत्रिका आली. कार्यक्रम पत्रिकेत दहा जणांची नावं आहेत. प्रत्येकाला विषय दिला आहे. पण माझं नाव नाही. मीही कोअर कमिटीचा सदस्य आहे. पक्षाचा सरचिटणीस आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे, अशी नाराजी मोरे यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली; अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी”

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला, राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…

सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर आज तुम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here