Home महाराष्ट्र …यामुळे मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस

…यामुळे मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस

मुंबई : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतंच ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. यावेळी अमृता फडणवीस आम्हाला भविष्यात राजकारणात दिसतील का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अमृता फडणवीस यांनी मी अनफिट असल्याचं उत्तर दिलं.

राजकारणात नसतानाही एवढं ट्रोलिंग होतं आणि मला जे बोलायचंय ते मी बोलते. राजकारणात जाईन तर कशी हालत होईल माझी. मला वाटतं मी सरळ बोलते. मला कोणाचीही भीती नाही. मी माझ्या हिशोबानेच काम करु शकते. त्यामुळे मी राजकारणासाठी अनफिट आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

दरम्यान, साहजिकज आता आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत तर शिवसेनेवाले माझी काही स्तुती नाही करणार. त्यामुळे मला जेंव्हा काही व्हॅलीड मुद्दे मिळाले की मी ही त्यावर बोलणार, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“मराठा आंदोलक आक्रमक, मुंबईतील सीएसटी परिसरात ठिय्या आंदोलन”

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तीरस्कार करतंय- गोपीचंद पडळकर

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हा भाजपचा एककलमी कार्यक्रम- अशोक चव्हाण

“भारताचे पहिले हिंदकेसरी काळाच्या पडद्याआड, कोल्हापूरचे कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचं निधन”