आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केलाय.
हे ही वाचा :भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा
शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत. देशावर आणि राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटसमयी शरद पवार धावून गेले आहेत. मग गुजरातमधील भूकंप असो, किल्लारीचा भूकंप असो, कोल्हपूर सांगलीला आलेला महापूर असो… प्रत्येकवेळी शरद पवार मदतीसाठी पुढे गेले, असं निलेश लंके म्हणाले आहे.
देशाच्या राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, देशाचं राजकारण नेहमी त्यांच्याभोवती फिरत राहतं. मग अशा नेत्याविषयी बोलताना जरासं भान बाळगावं, असा सल्ला निलेश लंके यांनी चंद्रकांतदादांना दिला.
महत्वाच्या घडामोडी –
“चंद्रकांत पाटलांनी काश्मीरला जाऊन अतिरेक्यांना दम द्यावा, आम्हांला शहाणपण शिकवू नये”
“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मिरजेत नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”
“हिंदुत्त्वाबद्दल विचारधारा एक असेल तर राज ठाकरेंनी भाजपसोबत जावं”