आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे, वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवारी मिळालेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शनकरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पुर्ण मतदार संघात रॅली काढून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केले. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना येथील जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळे जनतेने यंदा बापूसाहेब पठारे यांनाच आमदार करण्याचा निश्चय केलेला आहे. या मतदार संघातून कोणाचे आवाहन नाही, असे म्हंटले आहे.
पुण्यातील बहुचर्चित पैकी एक वडगावशेरी मतदार संघ येतो. आयटी पार्क तसेच विकसीत परिसर असलेल्या या वडगाव शेरीत लोहगाव, खराडी, वाघोलीचा काही परिसर, येरवडा, विश्रांतवाडी चंदननगर असा परिसर आहे. माजी आमदार राहिलेले बापूसाहेब पठारे यांना यावेळी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बापूसाहेब पठारे यांची मतदारसंघात पकड आहे. त्यांनी सरपंच ते आमदार असा प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे त्यांना मतदार संघातील जान देखील आहे.
ही बातमी पण वाचा : “राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर, आता अजित पवारांनीही जाहीर केली यादी; ‘या’ नेत्यांना दिली संधी”
त्यांनी खराडीमधून ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच होत आपल्या राजकीय जीवनास सुरुवात केली. नंतर ते पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य आणि नंतर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ते स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही. मध्यंतरी त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. परंतु, राष्ट्रवादीची फुटाफूट झाल्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) परत आले. आता दुसऱ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत.
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांच्यासोबत त्यांचा सामना होणार आहे. विद्यामान व माजी आमदार असा हा सामना वडगाव शेरीत रंगला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“भाजप, ठाकरे गट, पवार गटानंतर आता काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी”
निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामे