‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ म्हणत पुण्यात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स; अमोल मिटकरींचा टोला, म्हणाले..

0
634

पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्स लागलेले पाहायला मिळत आहेत. त्यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी  यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

‘आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त’, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या बॅनरवरुन टोला लगावला आहे.

दरम्यान, अमोल मिटकरी यांच्यासह काही पुणेकरांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बॅनर्सवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…”

“विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी, महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही”

सरकारच्या नाकर्तेपणामुळे राजकीय आरक्षण रद्द झालं- देवेंद्र फडणवीस

“केवळ याच जन्मात नाही, तर पुढच्या जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here