ठाण्यात राजकीय तणाव; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांनी फाडले

0
566

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 14 जून रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांकडून आपआपल्या भागात बॅनर्स लावून राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील मुंब्रा परिसरातही शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. मात्र 13 जून रोजी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी हे बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हे ही वाचा : संभाजीराजे हे आमचे छत्रपती, मात्र शिवसेनेवरील टिका खपवून घेतली जाणार नाही

दरम्यान, राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इरफान सय्यद यांच्याकडून मुंब्रा परिसरात बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र बॅनर फाडण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 54 वा वाढदिवस; वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

…म्हणून फडणवीसांनी आपणांस विश्रांतीचा सल्ला दिलाय; अमोल मिटकरींचा सदाभाऊ खोतांना टोला

काँग्रेसची मोठी खेळी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here