बंड्या तात्यांनी महिलांची तात्काळ माफी मागावी, अन्यथा खळखट्याक अटळ; रूपाली पाटलांचा इशारा

0
691

मुंबई : सुपर मार्केट तसंच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रिसाठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. अशातच साताऱ्यात ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात’ असं म्हणत त्यांनी मला विचारावे, मी त्यांचे आव्हान स्वीकारून पुराव्यासहीत सिद्ध करून दाखवायला तयार आहे, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हंटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : बंड्या तात्यांनी महिलांची तात्काळ माफी मागावी, अन्यथा खळखट्याक अटळ; रूपाली पाटलांचा इशारा

महाराष्ट्राच्या महिला लोकप्रतीनिधी व लोकनेत्याच्या लेकींना दारू पिऊन नाचतात” म्हणनारे बंडातात्या वारकरी संप्रदयाला लागलेला डाग आहे. तात्याला येरवड्यात उपचाराची गरज समस्त महिलांची तात्काळ माफी मागावी अन्यथा #खळखट्याक अटळ आहे …, असं रूपाली पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात”; बंडातात्या कराडकर यांचं वादग्रस्त वक्तव्य

“उद्धव ठाकरे-अजित पवार ही ढवळ्या पवळ्याची जोडी”

“ राणे महासंत आहेत, त्यांची…”; नितेश राणेंना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर गुलाबराव पाटलांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here