सनातन संस्थेवर बंदी घाला- हुसेन दलवाई

0
445

मुंबई | सनातन संस्था महाराष्ट्रात दहशतवाद पसरवरत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याते देखील या संस्थेचा सहभाग आहे. यामुळे सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी मागणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात काही लोकांना विनाकारण अडकवण्यात आलं आहे. या हिंसाचारात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग होता. हे दोघेही दहशतवाद पसरवत असल्यामुळे नव्या सरकारने यांच्याबाबतही भुमिका घ्यावी, असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे.

राज्यात आता पुरोगामी विचारांचं सरकार आलं असून काँग्रेसने आपल्या कार्यकाळात चूक केली होती. मात्र हे सरकार महाराष्ट्रात शांतता ठेवण्यासाठी अशा संस्थांवर बंदी घालेल, असं हुसेन दलवाई म्हणाले.

दरम्यान, सनातन संस्थेवर बंदी घालण्यावर सरकार विचार करेल असा विश्वास हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

रणवीर सिंहचा नविन सिनेमातील हटके लुक रिलीज

jio, Vodafone-Idea, Airtel चा ग्राहकांना फटका; रिचार्ज दर वाढणार!

देवेंद्र फडणवीसांना ‘मी’ पणाचा दर्प नडला- शरद पवार

अजित पवार भाजप मध्ये जाण्याचं ‘हे’ होतं कारण.. शरद पवारांनी केला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here