आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. आणि शिंदेंनी भाजपसह सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली. अशातच आता शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनी काल उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
थापाचे मातोश्रीवर काही काम राहिलं नाही. तो बाळासाहेबांचा सेवक होता. तो गेला, का गेला? मला माहित नाही त्याला कोणी बोलवून घेतलं माहित नाही, असं अरविंद सावंत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : ‘आमची निष्ठा राज ठाकरे आणि मनसेसोबतच’, मनसैनिकांनी दिले एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रं
त्याच्यावर काय अन्याय होता. त्याला काय राजकीय अभिलाषा होती का? बाळासाहेबांनी मुलासारखी सांभाळलेली ही माणसे आहेत., असं सावंत म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेतल्या अनेकांना फोन येत आहेत, पैसे देतो या. विशेषत: शाखाप्रमुखांना अशा प्रकारच्या ऑफर दिल्या जात असल्याचा दावाही सावंत यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘.. या कारणासाठी राष्ट्रवादी-भाजपचे बडे नेते एकाच मंचावर’ ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; बाळासाहेबांच्या विश्वासू सेवेकरीनं शिंदे गटात केला प्रवेश