Home महाराष्ट्र “राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसून येते, आता त्यांच्याकडून हिंदू रक्षणाची अपेक्षा”

“राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसून येते, आता त्यांच्याकडून हिंदू रक्षणाची अपेक्षा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गुरु माँ कांचन गिरी आणि सूर्याचार्य आज मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भेटाबाबतचं स्पष्टीकरण दिलं.

हिंदुत्व रक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती गुरू कांचन गिरी यांनी दिली. तसेच हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी ही भेट होणार असल्याचे गुरु माँ कांचन गिरी यांनी सांगितले.

हे ही वाचा : शिवसेनेचा भाजपाला धक्का; ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार आणि हिदुत्व बुडवले आहे. बाळासाहेब हे वाघ होते. हिंदुत्वासाठी ते कायमच लढत राहिले. ते जे बोलायचे ते करायचे. ते एक हिंदूवादी होते. त्यांचा हिंदुराष्ट्र हाच संकल्प होता. ते हिंदुत्वासाठी वाघासारखी डरकाळी फोडायचे. ते उद्धव ठाकरेंसारखे नव्हते. उद्धव ठाकरेंनी मुस्लिम हिंदू विरोधी पक्षांना घेऊन सत्ता मिळवली., अशी टीका गुरू माँ कांचन गिरी यांनी केली.

दरम्यान, पालघर मध्ये साधूंची हत्या झाल्यानंतर त्यांची आपले कान आणि डोळे बंद ठेवले, याची खंत आहे. मात्र आता राज ठाकरेंकडून हिंदू रक्षणाची अपेक्षा आहे. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसून येते. बाळासाहेबांचा संकल्प ते पूर्ण करतील, अशा विश्वास गुरू माँ कांचन यांनी यावेळी व्यकत केला.

महत्वाच्या घडामोडी –

फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळे बाहेर काढणार- नवाब मलिक

“शरद पवार आमच्यापेक्षा मोठे, त्यात काही वादच नाही”

“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, कोल्हापुरात अनेक तरूणांचा मनसेत प्रवेश”