कोल्हापूर : महापुरामुळे अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील तळीये, चिपळूण या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत. आज त्यांनी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी गावाची पाहणी केली. तसेच शिरोळ तालुक्यातील पाहणीदरम्यान, मुख्यमंत्र्यांभोवती ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.
शिरोळमध्ये पाहणी करत असताना, नागरिक मुख्यमंत्र्यांना आपल्या समस्या सांगत होते. शिरोळ गाव आठवडाभर पाण्यात आहे. हे पाणी सांगलीतील जत तालुक्याला वळवलं तर हा दरवर्षी महापूर येणार नाही. आमचा शिरोळ तालुका महाराष्ट्राला निधी देईल इतका मोठा तालुका आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढा, असं स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करुन योग्य मदत द्यावी, जाहीर केलेली तुटपुंजी 10 हजारांची मदत ही स्वच्छता आणि जेवणखाण्याला पुरेल एवढी ही मदत वाढवावी, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली. तसेच मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंचे वंशज आहेत, ढाण्या वाघ आहे तो महाराष्ट्राचा. आम्ही आवाज दिल्यावर ते थांबले, त्यांनी आमचं ऐकून घेतलं. मुख्यमंत्री आमच्या मागण्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे, असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल; शिरोळ, नृसिंहवाडीत पूरस्थितीची केली पाहणी
“मोदींच्या सूचनेमुळे नितीन गडकरींनी घेतली शरद पवार यांची भेट; गुप्त भेटीमुळे चर्चांना उधाण”
…अन्यथा मनसे स्टाईलने रेल भरो आंदोलन करावं लागेल; मनसेचा राज्य सरकारला इशारा
कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेल्या संतापावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…