“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”

0
539

मुंबई : हिंदुत्व हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचंच. पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाऊन स्वत:ची तत्व विकली आहे., असं म्हणत भाजप नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, असं म्हणत प्रसाद लाड यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रसाद लाड यांनी बाळासाहेबांना वंदन केलं. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, जनसंघाच्या सर्वच नेत्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे. आम्ही कुणाला विसरलो नाही. अटलजी, अडवाणीजी आमचे आदर्श आहेत आणि राहतील, असं प्रसाद लाड म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

या देशाला भारत नाही हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे- संभाजी भिडे

“जयंत पाटील पात्रता नसताना राजकारणात आले आहेत”

“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”

चंद्रकांत पाटील यांचं गणित कच्चं, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष- अब्दुल सत्तार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here