सांगली : राज्यातील दुध उत्पादक खूपच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने येत्या 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत दूध दर आंदोलन करण्यात येणार आहे. या काळात 5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना दिली आहे. सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे खोटं बोलत आहे. दूध भुकटी केंद्राने आयात केली नसताना, दूध भुकटी आयात केली, असं खोटं बोलून थोरात दिशाभूल करत आहे, असा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला. जर दूध भुकटी केंद्राने भुकटी आयात केली असेल, तर त्याचा पुरावा द्यावा, अशी मागणीही खोत यांनी केली.
दरम्यान, राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. काही दूध संघांचेच दूध खरेदी करत आहे. अशा गोष्टींमुळे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, असंही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रिय मंत्र्याला पत्र, केली ‘ही’ महत्वाची विनंती
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे