मुंबई : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे. तसा प्रस्तावच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तेे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, आम्हाला दि. बा. पाटील यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नव्या मोठ्या प्रकल्पाला दि. बा. पाटील यांचे नाव प्रकल्पग्रस्त कृती समितीने सूचवावे, असं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
…त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती आणखी चांगली असती- जयंत पाटील
“शिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे, वाट लावली मुंबईची”
“वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची”
“मुंबई पाण्याने भरी, मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ही कोणाची जबाबदारी”