मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा निश्चित झाली आहे. यासंबंधी गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोरील महात्मा गांधी रोड, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेट येथे उभारण्यात येणार आहे.
फोर्ट परिसरात बाळासाहेब ठाकरेंचा नऊ फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यासंबंधीचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या स्मारकाची जागा निश्चित झाली आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना 1996 साली केली होती.
महत्वाच्या घडामोडी-
-माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे – जयंत पाटील
-मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी.. पालिकेमार्फत लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु होणार!
-“रोज उठून पक्षाविरोधात कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही”
-नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांची मंजूरी