धनकवडीतील मतदार यादीत घोळ; ११ मतदारसंघांचे मतदार समाविष्ट; राष्ट्रीय समाज पक्षाच्या बलाजी पवारांचा दावा

0
512

पुणे – लवकरच पुणे महापालिका निवजडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. अनेक इच्छूक उमेदवर प्रचारही करत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्र. ३७ (धनकवडी -कात्रज डेअरी) च्या प्रारूप मतदार यादीत अत्यंत गंभीर स्वरूपाच्या चुका उघडकीस आल्या आहेत. या प्रभागाच्या यादीत तब्बल ११ वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतील मतदारांचा समावेश झाल्याने यादीच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही प्रशासकीय चूक नसून मतदारांच्या मतदान हक्काशी केलेला मोठा अन्याय असल्याची खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराचे बलाजी पवार यांनी व्यक्त केली आहे.

या गंभीर चुकीच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष- पुणे शहर तर्फे (दि. २६/११/२५) रोजी कात्रज-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात अधिकृत ‘हरकत’ दाखल करण्यात आली आहे.

यादीतील गोंधळाचे स्वरूप :

  • प्रभाग क्र. ३७ शी वास्तविक संलग्न नसलेल्या, हद्दीला स्पर्शही न करणाऱ्या सात विधानसभा मतदारसंघांतील मतदार यादीत समाविष्ट झाले आहेत.
  • या गोंधळामुळे प्रभाग ३७ मधील अनेक स्थानिक मतदार इतर प्रभागांच्या याद्यांमध्ये फेकले गेले असण्याची शक्यता आहे.
  • ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांना निराशेला सामोरे जावे लागणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे बालाजी पवार यांनी प्रशासनाला तातडीने या प्रारूप यादीची फेर तपासणी करण्याची आणि तात्काळ दुरुस्त करून अचूक मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. “मतदारांचा हक्क सुरक्षित राहिलाच पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here