चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग 14 व्या हंगामातील तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 10 धावांनी विजय झाला आहे.
कोलकाताने हैदराबादला 188 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठवाग करताना हैदराबादची सुरुवात खास राहिली नाही. मात्र, नंतर जॉनी बेअरस्टोने संघाचा डाव सावरला.बेअरस्टो आणि मनिष पांडेने डाव सांभाळत 92 धावांची भागीदारी केली.ही भागीदारी 13 व्या षटकांत पॅट कमिन्सने तोडली. त्याने बेअरस्टोला 55 धावांवर बाद केले. त्याने ही खेळी 40 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह केली.
हैदराबादला अखेरच्या षटकात 4 षटकांत 57 धावांची गरज होती. यावेळी अर्धशतकी खेळी करणाऱ्या मनिष पांडेच्या जोडीला विजय शंकर फलंदाजी करत होता. मात्र, तो 18 व्या षटकांत 7 चेंडूत 11 धावा करुन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अब्दुल समदने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 2 षटकार मारत हैदराबादच्या विजयाच्या आशा जागवल्या होत्या. मात्र, शेवटच्या षटकांत समद आणि पांडेला 22 धावा करता आल्या नाही. त्यामुळे अखेर हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तर शाकिब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांच्या सभेची पुनरावृत्ती, फक्त यावेळी पावसात भिजले जयंत पाटील”
…हे भाजपाचे राजकारण नाही तर काय सुरू आहे – नवाब मलिक
सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय