अहमदनगर : विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या नियुक्तीवरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यपालांनी विधानसभेचे 12 आमदार लटकवून ठेवले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने चांगला निकाल दिला आहे, असं म्हणत भविष्यात असे राज्यपाल येऊ शकतात असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील वाटलं नसेल, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
एका खाजगी कार्यक्रमात आमदार विनय कोरे यांनी विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, माझं देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचं बोलणं झालंय. आपलं सरकार येईपर्यंत सदस्यांची नियुक्ती करायची नाही. यावरून राज्यपालांवर राज्यपालांचा दबाव आहे, हे स्पष्ट होतं. भाजप राज्यपालांवर किती दबाब आणणार? अशाने राज्यपालांची प्रतिष्ठा खराब होईल, असं मुश्रीफ म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“…तर राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे”
आमचं ठरलंय! 2024 ला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही; संजय राऊतांचं मोठं विधान
इथं लोकांना प्यायलं पाणी नाही आणि नावं कसली बदलताय?; औरंगाबादच्या नामांतरावरून इम्तियाज जलील कडाडले