मुंबई : जी परिस्थिती संपूर्ण जगावर ओढवली आहे. अश्या परिस्थितीत सर्व जात पात धर्म आणि पंथांनी, अपले उत्सव अवरते घेतले आहेत. बाबासाहेबांना वंदन करताना मला भिम सैनिकांना धन्यवाद द्यायचं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिम सैनिकांचे आभार म्हणाले.
बाबासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवलं. त्या काळात बाबासेहबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला. आज संपूर्ण जग विषाणू विरुद्ध लढा देतोय. लढाई ही चालूच आहे. या लढाईत भिम सैनिक खांद्याला खांदा लाऊन लढा देतोय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात काहीही विचित्र सुरु नाहीये. सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…
मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा पलटवार
जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना करोना
पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा; देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन