Home महाराष्ट्र महाराष्ट्राने काय करावं हे Axis बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगू नये- प्रियांका चतुर्वेदी

महाराष्ट्राने काय करावं हे Axis बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगू नये- प्रियांका चतुर्वेदी

मुंबई : अमृता फडणवीस आणि शिवसेना नेत्यांमध्ये राजकिय वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अमृता फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. यावर शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चांगला नेता कायम न ठेवणे हा महाराष्ट्राचा दोष असल्याची बोचरी टीका त्यांनी केली होती. या टीकेला प्रतृत्तर देताना महाराष्ट्रातील जनतेने काय करावे, हे सांगण्याचा हक्क Axis बँकेच्या कर्मचाऱ्याला नाही. अशी जोरदार टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे.

ज्यांनी भिंतीवर खरडवून ठेवलं आहे त्यांनी ते वाचायलाही शिकावं, असं म्हणत प्रियांका चतुर्वेदी यांनी अप्रत्यक्ष फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात Axis बँकेत खाती वळवण्याचा निर्णय हा हितसंबंधातून घेतला होता का, याची चौकशी व्हावी. तसंच यानंतर Axis बँकेकडून भाजपला किती सीएसआर निधी देण्यात आला का, हेदेखील तपासण्यात यावे, असंही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

-मंत्रिमंडळाचा विस्ताराआधी राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य; ‘या’ आमदाराचे कार्यकर्ते देणार राजिनामे

-…म्हणून रायगड जिल्ह्यात शेती शिल्लक राहणार नाही- शरद पवार

-अमृता फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, म्हणतात…

-सत्तांतर झालं असलं तरी शिवसेना आणि भाजपचं रक्त एक आहे- चंद्रकांत पाटील