आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : देशभरात ‘जय भीम’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याने साकारली असून हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. नुकताच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनीही हा चित्रपट पाहिला. यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिली आहे.
जय भीम हा चित्रपट पाहून अस्वस्थ व्हायला झाले, प्रश्न एकच पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर… जय भीम, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
हे ही वाचा : शरद पवारांना पुरावे देणार, त्यांनाही कळू द्या, त्यांचे मंत्री काय कांड करतात- देवेंद्र फडणवीस
दरम्यान ,मला आठवत नाही की, मी माझ्या भाषणाच्या शेवटी जय भीम कधी म्हणायला लागलो. ही घोषणा एका जातीशी संबंधीत नसून ते एक ऊर्जास्रोत आहे. जे तुम्हांला अन्यायाविरुद्ध, स्वाभिमानासाठी, स्वत्वासाठी उभे राहायला मदत करते, ताकद देते. आजही आपण पूर्णपणे जातीभेदाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडलेलो नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जय भीम पिक्चर बघितला अन मनापासून अस्वस्थ झालो. प्रश्न एकच पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर…
जय भीम #JaiBhim— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश”
राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मर्जी सांभाळत असताना संजय राऊतांचा घुंगरू शेठ झालाय; चित्रा वाघ यांचा टोला
राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही; शिवेसनेची टीका