औरंगाबाद हादरलं!! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, चिमुकलीचा ओठ तुटला

0
195

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागातील ही घटना घडली आहे. एका 7 वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या नराधमाने तिच्या ओठाचा चावा घेतला. यामध्ये चिमुकलीचा ओठ तुटल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पीडित मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेतला असता नराधम फरार झाला असून  पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल; बाळा नांदगावकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

“सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण”

….तर ठाकरे सरकार शिवसेनेची देखील चौकशी करणार का?; आशिष शेलारांचा सवाल

के.एल राहुल व ख्रिस गेलची शानदार फलंदाजी; पंजाबचा आरसीबीवर शेवटच्या चेंडूवर विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here