Home महाराष्ट्र “बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं”

“बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं”

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला देण्यात यावं, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. मात्र काँग्रेसने या नामांतराला विरोध दर्शविला. यावर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एक विनंती केली आहे.

शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच औरंगाबादच्या नामांतराला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही, कॉंग्रेसही विरोध करणार नाही. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये काहीही मतभेद होणार नाही, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.

दरम्यान, येत्या 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरेंनी ही महत्वपूर्ण मागणी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ देणार नाही- अतुल भातखळकर

“कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचं निधन”

“…त्यामुळे सर्व महापालिकेवर भाजपचाच महापौर होणार”

“…तर हे सरकारच केंद्रामध्ये उचलून ठेवा”