शिवसेनेमुळेच औरंगाबादचा विकास झाला; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा!

0
362

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : शिवसेनेमुळे औरंगाबाद शहराचा विकास झासा आहे. असं प्रतिपादन आमदार अंबादास दानवे यांनी केलं आहे. भावसिंगपुरा प्रभागात रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

शहरात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर झाले, मौलाना आझाद रिसर्च सेंटर झाले. सलीम अली सरोवर विकसीत करण्यात आले. 1680 कोटींच्या पाणी योजनेच्या माध्यमातून लवकरच नागरिकांना घराघरात 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचे विविध विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातूनच झाली आहे. शिवसेनेमुळेच शहराचा विकास गतीने होत आहे. असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : “गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे परत आणू; भाजप खासदाराच्या विधानाने खळबळ”

शहराचा विकास झपाट्याने होत असून हे शहराने सुपर संभाजीनगरच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज प्रत्येक वॉर्डात सिमेंटचे रस्ते होत आहेत. ज्या ठिकाणी दोन पदरी रस्ते होते त्याठिकाणी चार पदरी रस्ते होत आहे. ज्या ठिकाणी चार पदरी रस्ते होते त्या ठिकाणी सहा पदरी रस्ते होत आहेत. नवनवीन उड्डाणपुल शहरात झाले आहेत. शहरात सर्वत्र एलईडी लाईट लागले आहेत. भूमिगत गटार योजनेची कामे झाली आहेत. नागरिकांसाठी प्रभागांमध्ये उद्यान विकसित केले आहेत. शिवसेना प्रथम संघटना आहे जी सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असते, असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, शहराच्या विकासासाठी, नागरिकांच्या सेवेसाठी, सुरक्षेसाठी ही अग्रेसर आहे आणि यापुढेही कायम राहील असं अभिवचनही शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त करा; किरीट सोमय्या यांची आक्रमक मागणी

“शिवसेना-राष्ट्रवादीकडून राणे समर्थकांचा करेक्ट कार्यक्रम; रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचं वर्चस्व”

“बिग बाॅस फेम सुरेखा कुडचीसह अनेक कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश; सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here