मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना योग्य ते महत्त्व मिळत नाही. यासाठी पक्षाचा राजकीय कार्यक्रम घेऊन प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीकेचा बाण सोडला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आज मुख्यमंत्र्यांना भेटून ‘न्याय’ योजनेसाठी पाच हजार कोटींचे पॅकेज मागणार ही धुळफेक आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल नियुक्त जागांचे शिवसेना 5 राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेस 3 ऐवजी समान वाटपाची मागणी करणार ही बातमी आहे. कही पे निगाहे…,” असं भातखळकर म्हणाले. त्यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली.
धूळफेक
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आज मुख्यमंत्र्यांना भेटून “न्याय” योजनेसाठी पाच हजार कोटींचे पॅकेज मागणार.बातमी
राज्यपाल नियुक्त जागांचे शिवसेना ५ राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेस ३ ऎवजी समान वाटपाची मागणी.कही पे निगाहे…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“मुख्यमंत्र्यांकडून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास परवानगी, शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय”
“पाकिस्तानातून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता”
मी बरा आहे, काळजी करू नका; धनंजय मुंडेचं समर्थकांना आवाहन
चंद्रकांत पाटलांनी केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणाले…