मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. पण लसींचा तुटवडा भासत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांकडून वारंवार सांगण्यात येतंय. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
“लस उपलब्ध नाही कारण साठा नाही. साठा आहे पण लसीकरण होणार नाही. याचा अर्थ असा नाही की लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरूच आहे. सर्वांना लस मिळेल. याचा अर्थ कुणीही जाऊन लस घेऊ शकतो असा नाही. नोंदणी करा मग लस मिळेल. पण नोंदणी केली तरी लस मिळेलच असं नाही. – पक्षाचे मुख्यमंत्री”, असं ट्वीट करत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
लस उपलब्ध नाही कारण साठा नाही.
साठा आहे पण लसीकरण होणार नाही.याचा अर्थ असा नाही की लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरूच आहे. सर्वांना लस मिळेल. याचा अर्थ कुणीही जाऊन लस घेऊ शकतो असा नाही. नोंदणी करा मग लस मिळेल. पण नोंदणी केली तरी लस मिळेलच असं नाही.– पक्षाचे मुख्यमंत्री
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 12, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही, त्यांना मंत्रीपद टिकवायच आहे- नारायण राणे
“निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, हेच का तुमचे वित्तनियोजन?”
“युतीत असताना एक बोलणारे शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं”
…हेच का ते मुंबई माॅडेल?, ठाकरे सरकार फक्त PR जोरदार; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल