मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
आता राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या गृह विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आली त्याची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात काय चुकीचे बोलले मुख्यमंत्री? माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली आहे, असं प्रत्युत्तर मनिषा कायंदे यांनी यावेळी दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाचं केलं स्वागत, म्हणाल्या…
मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदार अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार
शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे- धनंजय मुंडे