मेटेंच्या अंतिम दर्शनासाठी आल्यानं गुणरत्न सदावर्तेंना, मराठा कार्यकर्त्यांकडून मारण्याचा प्रयत्न; सदावर्तेंनी काढला पळ

0
555

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज अशी ओळख असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. याचा मोठा धक्का राजकीय वर्तुळासह सामाजिक क्षेत्रालाही बसला.

विनायक मेटे यांचं पार्थिव मुंबईतील त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. अनेक समर्थकांसह राजकीय नेत्यांनी निवासस्थानी गर्दी केली आहे. यावेळी विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या ॲड. गुण रत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळालं.

हे ही वाचा : माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे; विनायक मेटेंच्या मातोश्रींची मागणी

सदावर्ते गो बॅक घोषणा देत कानाखाली मारण्याचा प्रयत्न मराठा कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांच्या समय सुचकतेमुळे आक्रमक कार्यकर्त्यांच्या रोषातून सदावर्ते यांनी पळ काढला. मराठा आरक्षणाबाबत कायम विरोधाची भूमिका सदावर्ते यांनी कोर्टात घेतल्याने आज कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे; विनायक मेटेंच्या मातोश्रींची मागणी

“विनायक मेटे यांचं अकाली निधन मनाला वेदना देणारं”

वाहनांना हात केला, 100 नंबरला फोन लावला, पण तासभर मदतच मिळाली नाही; विनायक मेटेंच्या चालकाचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here