“माझा राजकीय प्रवास संपविण्याचा प्रयत्न; महिलेच्या आरोपांवर संजय राठोड यांचं स्पष्टीकरण”

0
535

मुंबई : शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार केली आहे.

यवतमाळ पोलिसांकडे याबाबतची तक्रार पोस्टाने करण्यात आली आहे. संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, अशी लिखित तक्रार या महिलेने केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.  यावर संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया देत माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. तसेच संजय नावाच्या साधर्म्यामुळे हा घोळ झाला असल्याचा दावा संजय राठोड यांनी यावेळी केला.

मी एका संस्थेचा पदाधिकारी होतो. त्या संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत 3 कर्मचाऱ्यांवर सातत्याने गैरहजर असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. जे बडतर्फ झाले त्या कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या. संस्थेच्या बाजूने निकाल लागला असून प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. मग अशावेळी मुलांचं भवितव्य लक्षात घेऊन संस्थेने शासनाकडे परवानगी मागितली आणि दोन शिक्षकं, स्वयंपाकी यांना घेतलं. या जागा भरल्यानंतर तात्पुरती नियुक्ती मिळाली. यावेळी एका शिक्षकाचं प्रकरण समोर आलं., असं संजय राठोड म्हणाले.

तात्पुरती नियुक्ती असल्याने त्या शिक्षकाने 2017 मध्ये स्वत:हून राजीनामा दिला. मधल्या काळात शिक्षक आणि नातेवाईक पुन्हा आले आणि घेण्याची विनंती केली. याचदरम्यान मी संस्थेचा राजीनामा दिला. त्यानंतर माझे सहकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाला माझा क्रमांक समजून मेसेज आले. त्यांचंही नाव संजयच आहे. यानंतर त्या शिक्षकाने 24 मे 2021 रोजी तक्रार केली. नंतर त्या प्रकरणाचा आधार घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले, असा दावा करताना मीदेखील वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची माहिती संजय राठोड यांनी दिली.

दरम्यान, नैराश्याच्या मानसिकतेतून तक्रार करण्यात आल्याचा दावा संजय राठोड यांनी केला. तसेच राजकीय विरोधक राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीचे फंडे वापरत असतात. मागील वेळी झालेल्या आरोपांचा आधार घेऊन आरोप होत आहेत, असंही संजय राठोड यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“माझा राजकीय प्रवास संपविण्याचा प्रयत्न; महिलेच्या आरोपांवर संजय राठोड यांचं स्पष्टीकरण”

‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपची पुन्हा एकदा युती

“भागवतराव कराडांची बरोबरी करण्याचं सोडाच, पण इम्तियाज जलील चंद्रकांत खैरेंपेक्षाही चांगले नेते”

पंकजा मुंडेंना अडचणीत आणणारा चिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत; न्यायालयाने विचारले अजून … ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here