मुंबई : महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्याच्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष कार्यकारी अधिकारी दालनात एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला अडवलं आणि मोठा अनर्थ टळला. पांडुरंग वाघ असं या व्यक्तीचं नाव असून हा अहमदनगर जिल्ह्यातील झापडी गावाचे रहिवाशी आहे.
वाघ यांनी शासनाकडून 2018 मध्ये वाळू उत्खनन व वाहतुकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी शासनास 8 लाख 72 हजार भरले होते आणि वाघ यांनी वाळू उत्खनन काम सुरू केलं होतं. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. गावकऱ्यांच्या वारंवार विरोधामुळे वाघ यांना नुकसान होत होतं.
वाघ यांनी भरलेले 8 लाख 72 हजार रुपये त्यांना लवकर परत मिळावे म्हणून त्यांनी मंगळवारी बाळासाहेब थोरात यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोनच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य वेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि आत्महत्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, पोलिसांनी वाघ यांना सीआरपीसी 41 (1) अंतर्गत अटक करत त्यांची जामिनावर सुटका केली. तसेच या पुढे असं पाऊल न उचलण्यासाठी समज सुद्धा पोलिसांनी वाघ यांना दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार म्हणून ओळखलं जाणार”
राखी सावंतचा ‘नगिना’ अंदाज पाहिलात?; पहा व्हिडिओ
“सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय”
जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प; चंद्रकांत पाटलांची टीका