“नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न”

0
435

ठाणे : शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांचा फोटो तांदळामुळे ठेवून मंत्रप्रयोग करणाऱ्या 2 मांत्रिकांना पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातून रंगेहाथ अटक केली आहे. तर मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू आहे.

कऱ्हे तलावली येथील एका घरात शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, पांढरा कोंबडा ठेवण्यात आला होता. यावेळी मांत्रिक मंत्रोच्चार करून जादूटोणा करत असताना पोलिसांनी 2 आरोपींना रंगेपाथ पकडलं. याप्रकरणी कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरु वारडी अशी अटक करण्यात आलेल्याची नावं आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

तुमचं डोकं फुटेल, पण 1 आमदार फुटणार नाही; सुधीर मुनगुंटीवारांचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर

हाक द्या, मी मदतीसाठी तिथे असेन; सहकाऱ्याच्या निधनानंतर शरद पवारांकडून शब्द

भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- अजित पवार

“जळगावचे सुपुत्र BSF जवान अमित पाटील यांना वीरमरण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here