Home महाराष्ट्र पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीय, दोषींवर कडक कारवाई करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीय, दोषींवर कडक कारवाई करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांच्या घरावरील हल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यानी पवार यांना फोन करून विचारणा केली. त्यानंतर राज्यात नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या हल्ल्याची निंदा केली आहे.

हे ही वाचा : सिलव्हर ओकवरील आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे, या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले. मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली. न्यायालयाने सुद्धा त्याची नोंद घेत एसटीच्या आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी देखील याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहचत असतानाच अचानक दुपारी शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमाव पोहचून त्याने घोषणाबाजी करतो व दगडफेक, चप्पलफेक करतो, ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना मी गृहमंत्र्यांना दिल्या असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“आज सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्या”

“INS विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांना पोलिसांकडून समन्स, उद्या चाैकशीसाठी हजर राहणार”

“एसटी आंदोलन; अॅड. गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात”