आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात होते. मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे झालेल्या गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे सोमय्या खाली पडले.
सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले. सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यास पुणे महापालिकेत गेले असता शिवसैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार केली असून गृहमंत्रालयानं गंभीर दखल घेवून चाैकशी सूरू केली आहे. भाजपा हा विषय सोडणार नाही आणि किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिला.
ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर उपस्थित होते.
मा.चंद्रकांत पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या इमारतीत गेले असता शिवसैनिकांनी हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. राज्यात टोळीचे सरकार चालू आहे का ? याबद्दल आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. सोमय्या यांना झेड सुरक्षाव्यवस्था असल्याने त्यांच्या भेटीच्या आधी पोलिसांनी तपासणी करणे आवश्यक असते. तरीही त्यावेळी शंभरजण इमारतीत लाठ्या आणि दगड घेऊन कसे होते, पुणे महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्थाही काय करत होती, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनाही धक्काबुक्की झाली. केंद्र सरकारने या हल्ल्याची दखल घेतली आहे. केंद्र सरकारचे सुरक्षा प्रमुख तीन दिवस पुण्यात आहेत. त्यांनी पुण्याच्या पोलीस प्रमुखांनाही नोटीस दिली आहे, अशी माहितीही चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिली.
भाजपाचे माजी खासदार किरीट जी सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात मी केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. भाजपा हा विषय कधीही सोडणार नाही. pic.twitter.com/GY2HMA8C7e
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 10, 2022
महत्वाच्या घडामोडी –
मुंबईत पर्यटनाला मिळणार चालना, दादर चौपाटीच्या धर्तीवर ‘व्ह्युवींग डेक’ उभारणार- आदित्य ठाकरे
मनसेचं मिशन पुणे; राज ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवतीर्थ’ वर महत्वपूर्ण बैठक
“कृष्णा चमकला, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर 44 धावांनी मात, मालिकेत आघाडी”