नागपूर : महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे .
आम्हाला सरकार पडण्याची घाई नाही. राजकारणात प्रत्येक जण लढणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे सुडाचा बदला सुडाने घेतला जातो. मात्र सुडाला सुडाने उत्तर नाही, तर वैचारिक उत्तर दिलं पाहिजे, असं म्हणत प्रविण दरेकरांनी ठाकरे सरकारवर पलटवार केला. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
एखादी कारवाई झाली तर त्यावर चर्चा होऊ शकते. आज संविधान दिवस आहे, संविधानाने प्रत्येकाचा हक्क सुरक्षित केला आहे. सुडाचे उत्तर सुडाने देऊ, असं म्हणणं म्हणजे संविधानाचा अपमान केल्यासारखं होईल, सामना हा त्यांचा आहे, त्यात ते आपले विचार मांडू शकतात. सरकार पडण्यासंदर्भात आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद आहे, त्यामुळे त्यांना सरकार पडण्याची भीती वाटते. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश आहे म्हणून ते भयाने पछाडले आहेत, असंही प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“मोगऱ्याच्या सुंगंधाने बहरली पंढरी! पाहा कार्तिकी एकादशीचे Exclusive PHOTO”
…जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन; मुख्यमंत्र्यांच्या सामनातील मुलाखतीचा प्रोमो प्रदर्शित
“जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन”
मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली- देवेंद्र फडणवीस