औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याचा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी केला. यावर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्यृत्तर दिलं आहे.
औरंगाबादमध्ये सध्या विकासाची गरज आहे. येथील लोकांना, इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा, नाव बदलायचं की विकास करायचा?, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे.
आधी पुढच्या 4 वर्षात औरंगाबादचा विकास करा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्या. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत
तुम्ही जर कचरामुक्त शहर केले तर मी स्वत: संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन. फक्त नाव बदलून तुम्ही काय साध्य करणार आहा, असंही जलील म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
“मासिक पाळी नाही हे सिद्ध करण्यासाठी विद्यार्थींनीची तपासणी करणं दुदैवी”
मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी 68 विद्यार्थिनींना काढायला लावले अंतर्वस्त्त्रे
..तर शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याचा विचार करावा- रुपाली चाकणकर
” राष्ट्रपुरुषांना अपमानित करणाऱ्या काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी”