Home महाराष्ट्र जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा; चंद्रकांत पाटलांचं काँग्रेस पक्षाला जाहीर आवाहन

जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा; चंद्रकांत पाटलांचं काँग्रेस पक्षाला जाहीर आवाहन

कोल्हापूर : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही प्रयत्नशील होते. मात्र, भाजपनं आपला उमेदवार देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. तर आम आदमी पक्षानेही आपला उमेदवार उतरवलाय.

हे ही वाचा : मोठी बातमी! रुपाली चाकणकरांनी दिला राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर जोरदार हल्ला चढवत थेट जयश्री जाधव यांना भाजपकडून लढण्यास सांगा, असं म्हटलंय. अजूनही 24 तास बाकी आहेत. जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा. आता माझ्या सहीने ए बी फॉर्म देतो. नानाला अर्ज मागे घ्यायला सांगतो, असं जाहीर आवाहनच चंद्रकात पाटील यांनी केलंय.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लागण्यापूर्वीही जयश्री जाधव यांना भाजपकडून तिकीटाची ऑफर दिली होती. मात्र, जयश्री जाधव यांनी विनम्रपणे ती नाकारात काँग्रेसकडूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्यांनी येऊनचं दाखवावं; शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही आक्रमक

हे सुराज्य स्थापन करताना…; राज ठाकरेंनी मनसैनिकांसोबत घेतली शपथ

IPL 2022! पंजाब किंग्सची साथ का सोडली?; अखेर के.एल.राहुलने केला खुलासा, म्हणाला…