भावाचा कॅच पकडत असतानाच एश्टन अगरला झाली दुखापत

0
174

पर्थ : वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मार्श वनडे कपमध्ये साऊथ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये एश्टन अगरच्या नाकाला बॉल लागला. आपल्या भावाचा कॅच पकडत असतानाच डावखुरा स्पिनर अगरला दुखापत झाली.

रविवारी मार्श वनडे स्पर्धेत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये सामना झाला. या सामन्यामध्ये साऊथ ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या एश्टन अगरचा भाऊ वेस अगरने हवेत बॉल मारला. वेस अगरने मारलेला बॉल कॅच पकडताना एश्टनला ही दुखापत झाली.

कॅच पकडताना एश्टनच्या हातातून बॉल सटकून त्याच्या चष्म्याला लागला आणि चष्मा तुटला. त्यानंतर त्याच्या नाकातून रक्त यायला लागलं.

दरम्यान, एश्टन अगरला झालेल्या या दुखापतीमुळे त्याला  मैदानाबाहेर जावं लागलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here