आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असतानाच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण पक्ष सोडणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यावर आता स्वत: अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. तसेच मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी यावेळी दिलं. ही चर्चा कोण करत आहे. या चर्चेला काहीही महत्त्व नाही. मी कोणताही असा निर्णय घेतलेला नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा : “शिवसेनेत पक्षप्रवेशाची लाट; नेवासेतील अनेकांनी माजी मंत्री गडाखांच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”
दरम्यान, विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनादरम्यान शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. या विश्वासदर्शक ठरावादरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे 11 आमदार गैरहजर होते. त्यानंतर या गैरहजर आमदारांवर हायकमांडकडून कारवाई केली जाणार, असं सांगण्यात येत होतं., असं असतानाच अशोक चव्हाण नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
महत्त्वाच्या घडामोडी –
अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागितली माफी; म्हणाले… मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल…
हे सरकार एक-दीड महिन्यात कोसळणार; आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी