मुंंबई : मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता तापू लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला मदत करावी, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक चव्हाण यांना कायदा कळत नाही, मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते आता वेड पांघरून पेडगावला जात आहे. ते आता केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. इतके वर्ष केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
घटनेच्या 102 व्या दुरुस्तीनंतरही राज्यात एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचा राज्य सरकारचा अधिकार आणि जबाबदारी कायमच आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने जबाबदारी पार पाडावी, असं चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं. तसेच राज्य सरकार याबाबतीत जबाबदारी झटकू शकत नाही. आताही चेंडू तुमच्याच अंगणात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडून किंवा केंद्र सरकारकडे चेंडू ढकलून तुम्ही मोकळे होऊ शकणार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“मराठा समाजाला कळून चुकलंय की, आरक्षणाच्या निर्णयाला पूर्णपणे महाविकास आघाडी जबाबदार”
अवघा देश बुडेल, असे यांचे महाराष्ट्र मॉडेल; अतुल भातखळकरांचा टोला
संज्या राऊतला अधिकार काय मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा?; निलेश राणेंचा हल्लाबोल
मराठा समाजाचं ठरलं! 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार; ‘या’ ठिकाणी होणार पहिला मोर्चा