आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये 2017 मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली होती, असा मोठा बाॅम्बस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. ते एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी पत्रकारांनी शेलार यांना, शिवसेनेच्या तुटलेल्या युतीसंदर्भात प्रश्न विचारला. यावर शेलार यांनी, पहाटेच्या शपथविधीच्याही दोन वर्षे आधी म्हणजे 2017 मध्येच राष्ट्रवादीसोबत युतीसंदर्भात अंतिम चर्चा झाली होती., असं म्हणत शेलार यांनी मोठा गाैफ्यस्फोट केला.
हे ही वाचा : “हिंदूजननायक असा उल्लेख करत औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यात जोरदार बॅनरबाजी; सभा होणार म्हणजे होणार?”
दरम्यान, आम्ही तेंव्हा म्हटलं होतं, तीन पक्षांचं म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे सरकार करू. त्यावेळी राष्ट्रवादीने या प्रस्तावाला नकार दिला. शिवसेनेशी आमचे जमूच शकत नाही, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं. असाही गाैफ्यस्फोट शेलार यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
आपापसातील बंधुभाव कमी करण्याचं वक्तव्य करणं योग्य नाही; शरद पवारांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
“भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले, तर मी माझे हात कलम करून घ्यायलाही तयार “
मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स; ‘या’ दिवशी होणार चौकशी