आशिष शेलारांचे आरोप बालिशपणाचे, त्यांची कीव येते- नाना पटोले

0
222

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. वाझे यांना कार घेण्यासाठी नाना पटोले आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत शेलारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार यांचा आरोप बालिशपणाचा आहे. त्यांच्या आरोपांची कीव येत असल्याचं नाना पटोले म्हणाले. शेलार हे अशाप्रकारचे आरोप करुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून हा विषय लावून धरला जात असल्याचं पटोले म्हणाले.

दरम्यान, अंबानींची वकिली करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? असा प्रश्नही पटोले यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचा दावाही पटोलेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मराठी फिल्म इंडस्ट्रीजमधील ‘या’ CUTEST COUPLE ला कोरोनाची लागण”

“एरवी दुपारनंतर कामाला सुरुवात करणारे उद्धव ठाकरे वाजेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?”

“NIA चा मोठा खुलासा! सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच”

चेल्यांना हाताशी धरुन उद्योगपतींकडून वसुली; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here